
पावसाळा आणि आहार | पावसाळ्यात आहार कसा असावा
या ब्लॉगमध्ये आपण पावसाळा आहार, पावसाळा आणि आहार, पावसाळ्यात आरोग्याची काळजी, पावसाळ्यात आहार कसा असावा, पावसाळी आहार , पावसाळ्यातील आहार विहार, पावसाळ्यातील आहार, पावसाळ्यात कोणता आहार घ्यावा, पावसाळा आरोग्य, याबद्दल माहिती घेऊ
पावसाळा सुरु झाला की जसे पाणी आणि अन्न या बाबतीत काळजी घ्यावी लागते तशीच काळजी हवे मध्ये होणाऱ्या बदलांची घ्यावी लागते. पावसाळ्यात हवा ओली व थंड असते. आजूबाजूला झुडुपे वाढू लागली कि डास, छोटे कीडे,माश्या वाढू लागतात. यामुळे जंतू संसर्ग वाढू लागतो. कपडे नीट वाळत नाहीत ते दमट राहतात व त्यातून बुरशी वाढते. कधी कधी कपडे ठेवतो त्या कपाटामध्ये देखील आतून बुरशी लागते व तिचा संसर्ग कपड्यावर होतो. त्यामुळे अशा कपड्यांचा शरीराशी संपर्क आला की त्वचाविकार होऊ शकतात
पावसाळ्यात आरोग्याची काळजी
हल्ली डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंगू सारखे आजार त्वरित पसरत आहेत. त्यामुळे ताप येणे, जुलाब होणे अशी लक्षणे दिसतात. कधी कधी हा आजार गंभीर स्वरूपही धारण करू शकतो.
यासाठी रोज घरामध्ये कडूनिम्बाची पाने,वेखंडाची पूड, ओवा, यांचा धूर करून घरात सकाळ -संध्याकाळ जाळावा. यासाठी कोळसा पेटवून त्यावर वरील द्रव्यांचे चूर्ण करून ते टाकत राहावे व त्यातून होणारा धूर घरामध्ये फिरवावा.
घरामध्ये हल्ली पाणी -टंचाई मुळे पाणी साठवून ठेवले जाते. त्यामध्ये डासांची अंडी राहू शकतात. म्हणून दर ४ दिवसांनी साठवलेले पाणी वापरून टाकावे व टब स्वच्छ धूउन परत पाणी भरून ठेवावे. घराबाहेर जास्त वाढलेले गवत काढून टाकावे म्हणजे किडे व डास कमी होतात.
कपाटांमधून बुरशी जमा होत नाही ना हे पाहावे. कपड्यांना इस्त्री करावी. कारण त्यामुळे कपडे निर्जंतुक होतात.
पाणी स्वच्छ ठेवणे आणि स्वच्छ ताजे गरम अन्न घेणे या दोन गोष्टींची काळजी घेतली की पावसाळा आपण छान एन्जॉय करू शकतो.
पावसाळा आणि आहार
आता पावसात खाता येतील अशा काही मस्त रेसिपीज
१) मिक्स भाज्यांचे पॅटीस -पावसाळ्यात भाज्या सर्व प्रकारच्या भरपूर येतात
कणसाचे कोवळे दाणे, उकडलेले रताळे व बटाटे, गाजर, हिरवी मिरची,आले इ.
कणसाचे दाणे मिक्सर मधून अगदी अर्धा मिनिट फिरवून भरड करावेत. रताळे १ व बटाटे २ उकडून कुस्करावेत,गाजर बारीक किसून घ्यावे, आलेमिरची वाटून घ्यावी. सर्व एकत्र मिसळावे व त्याचा गोळा बनवावा. मग त्या गोळ्याचे छोटे छोटे भाग करून तांदुळाच्या पिठीवर जाडसर थापावेत. तव्यावर ठेवून खरपूस भाजावेत. भाजताना बाजूने थोडे थोडे तेल सोडावे. लालसर भाजले गेले की काढावेत. हिरव्या पुदिनाच्या चटणी बरोबर गरम गरम खावेत. तळलेली भाजी खाण्यापेक्षा हा प्रकार जास्त हेल्दी आहे व चविष्ट लागतो.


२) धान्याचे वडे — तांदूळ, बाजरी, १-१ भाग, मुगडाळ, मसूर डाळ, हरभरा डाळ प्रत्येकी अर्धा भाग. हे सर्व २ तास भिजत घालावे. नंतर मिक्सर मधून भरड काढावे. त्यामध्ये भरपूर लसूण,लाल मिरची,कोथिंबीर वाटून घालावी. तीळ व ओवा घालावा.चवीप्रमाणे मीठ घालावे. या पिठात २ चमचे तेल गरम करून घालावे. व केळीच्या पानावर वडे थापून ते तव्यावर ठेवून बाजूने तेल सोडून भाजावेत.
हे वडे हिरव्या नारळाच्या चटणी बरोबर चांगले लागतात.ज्यांना या बरोबर काही पातळ हवे असेल त्यांनी अगदी पाण्यासारखे पातळ गरम गरम सांबार किंवा रसम बनवून त्यात बुडवून खायलाही हे वडे छान लागतात. पौष्टिक आहेत. डब्यात घालून न्यायला ही चांगला पदार्थ आहे.पटकन होतात.
अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा
For any queries simply fill below form and get in touch with us. or click here to contact us