डायबिटीस,ब्लड प्रेशर आहे तर मी काय खाऊ?
डायबिटीस आहार चार्ट, डायबिटीस आहार, डायबिटीस मे आहार, डायबिटीस का आहार, डायबिटीस रोगी का आहार, डायबिटीस मरीज का आहार, डायबिटीस आहार तालिका, ब्लड प्रेशर आहार
या ब्लॉगमध्ये आपण डायबिटीस आहार चार्ट, डायबिटीस आहार, डायबिटीस मे आहार, डायबिटीस का आहार, डायबिटीस रोगी का आहार, डायबिटीस मरीज का आहार, डायबिटीस आहार तालिका, ब्लड प्रेशर आहार याबद्दल माहिती घेऊ.
हल्ली साधारण पन्नाशी नंतर मधुमेह, रक्तदाब असे त्रास सुरु होताना दिसतात. मग हे खाऊ नका, ते खाऊ नका अशी न खाण्याच्या पदार्थांची यादीच मोठी होत जाते.तेल, तुपावर बंधने येतात. मिठाचे प्रमाण कमी करावे लागते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे रोजचे अन्न सपक व नावडत्या चवीचे होऊ लागते. मग ते कमी खाल्ले जाते. कधी कधी सगळ्याचा कंटाळा येऊन मग चमचमीत वस्तूंवर ताव मारला जातो. आणि त्याचा शरीरावर अजूनच दुष्परिणाम होतो. पोषण कमी पडते. थकवा वाढतो. आणि मग कितीही विटामिनच्या गोळ्या घेतल्या तरी तो कमी होत नाही.
अशावेळी, रोजचे जेवण चवदार कसे बनेल, कंटाळवाणे कसे होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे असते.
वृद्धांमध्ये तर ही समस्या जास्तच प्रमाणात येते. मागील लेखामध्ये आपण एकाच पदार्थ परिपूर्ण कसा बनवावा हे पहिले. खुपदा या वयात एका वेळी जास्त जेवण जात नाही. विभागून थोडे थोडे खावे लागते. जेवण थोडेच गेले असता पुन्हा थोड्या वेळाने भूक लागते.
डायबिटीस आहार | ब्लड प्रेशर आहार
साळीच्या लाह्या गरम करून त्यांना तूप व जिरे फोडणी द्यावी व त्याला सैंधव मीठ लावावे. कुरकुरीत लाह्या खाल्ल्या ही जातात व अतिशय आरोग्यदायी आहेत. कधी त्या १ कप घेऊन त्यात थोडे पाणी घालून शिजवाव्यात.मग थोडे दुध घालून, साखर घालून लापशी घ्यावी. त्यात एखादा बदाम बारीक करून, व बेदाणे घालावेत.
तांदूळ व मुगाचे पीठ एकत्र कालवून त्यात जिरे, ओवा, मीठ घालावे. त्यात गाजर किसून, पालक बारीक चिरून घालावा व तुपावर त्याचे धिरडे घालावे. खायला चविष्ट लागते. त्याबरोबर चटणी द्यावी. नंतर १ वाटी ताक फोडणी घालून प्यायला द्यावे. हा एक जेवणाला उत्तम पर्याय होतो.
घरात असतील त्या भाज्या बारीक कापून घ्याव्यात. थोडी मुग डाळ व तांदूळ धुवून परतून घ्यावेत. थोड्या तेलावर भाज्या व डाळ–तांदूळ याची खिचडी बनवावी. २ कोकम (आमसूल) कोळून घ्यावेत. त्यामध्ये १ कप पाणी घालून मीठ साखर घालावे व तूप जिरे फोडणी द्यावी. खिचडी बरोबर हे सार द्यावे. चवीने खाल्ले जाते.
सारांश
खरं तर, मधुमेह किंवा रक्तदाबाचा त्रास असतानाही चालणारे अनेक पदार्थ आहेत.पण त्याचा विचार फार कमी केला जातो. अयोग्य खाऊ नये हे जितके महत्वाचे आहे, तितकेच योग्य खाणे भरपूर गेले पाहिजे हे लक्षात घ्यावे. अचूक आहार शरीराची पोषणाची गरज नीट भागवतो. त्यामुळे थकवा येत नाही. हृदय, मूत्रपिंड यावर ताण येत नाही. यासाठी चालणाऱ्या अन्नाची आवड निर्माण कारणे गरजेचे असते. आणि त्यामध्ये जर विविधता आणली तर ते रोज खाणे ही नक्कीच आनंद देणारे ठरू शकते.
अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा
For any queries simply fill below form and get in touch with us. or click here to contact us
Quick Links