कॅन्सर वर आयुर्वेदिक उपचार
ayurvedic treatment for cancer in pune
कॅन्सर वर आयुर्वेदिक उपचार
कॅन्सर वर आयुर्वेदिक उपचार

कॅन्सर वर आयुर्वेदिक उपचार शक्य आहेत व ते घेणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. बरेचदा आधुनिक शास्त्राचे उपचार व आयुर्वेदीय उपचार असे दोन्ही  उपाय चालू ठेवण्याकडे रुग्णांचा कल दिसतो आणि त्यामुळे एकूणच रुग्णाच्या वेदना कमी होणे किंवा मूळ आजारा व्यतिरिक्त इतर त्रासांचे प्रमाण कमी होणे असे होताना दिसत आहे.

गेल्या काही वर्षामध्ये कॅन्सर या व्याधीचे प्रमाण बरेच वाढताना दिसत आहे. रोजच्या  रुग्ण तपासणीमध्ये ही या रुग्णांची संख्या वाढत आहे. शस्त्रक्रिया, केमोथेरपी किंवा रेडीयेशन सारखे तीव्र उपचार घेऊन सुद्धा पुन्हा हा आजार डोके वर काढतो.

कोणत्याही रुग्णाच्या नातेवाईकांना नेहेमी असेच वाटत असते की, माझ्या पेशंटला कमीत कमी त्रास व्हावा. “Every health science is for betterment of mankind” या न्यायाने रुग्णास बरे करणे आणि पूर्ण बरे होणे शक्य नसलेल्या आजारामध्ये, त्याला सापेक्ष, जास्तीत जास्त उपशय म्हणजे आराम देण्याचा प्रयत्न करणे हे प्रत्येक डॉक्टरचे कर्तव्य असते.

कॅन्सर कसा होतो

मात्र  कॅन्सरचे प्रमाण इतके का वाढते आहे? या मुळापर्यंत जाण्याची गरज आता मात्र नक्कीच निर्माण झाली आहे. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे प्रत्येक रोग हा कारणाशिवाय घडत नाही. त्यामध्ये आहार, विहार आणि प्रज्ञापराध असे कारणांचे तीन प्रमुख गट आहेत. आजही सखोल विचार करून पाहता असे दिसते, की कोणताही रोग हा वरील ३ कारणांच्या मुळेच घडत असतो.

कॅन्सर वर आयुर्वेदिक उपचार
कॅन्सर वर आयुर्वेदिक उपचार

कॅन्सर ची लक्षणे: कॅन्सर कसा होतो

यामध्ये आहाराचा विचार सर्वात महत्वाचा. आपण पूर्वी घेत असलेला आहार आणि आजचा आहार यामध्ये खूप तफावत आहे. पूर्वी ठराविक जेवण, ठराविक वेळेला खाल्ले कि खाणे हा विषय संपत असे. गोड-धोड फक्त सण असला तरच.

सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या मूळ आहाराशी प्रत्येक जण प्रामाणिक होता. दाक्षिणात्य माणूस हा त्याचा आहार घेत असे, तर गुजराथी माणूस त्याचाच. पंजाबी अन्न हे फक्त पंजाबी माणूसच खात असे

आपण चिनी नसल्यामुळे चायनीज अन्न आपल्याला माहित नव्हते. म्हणजे जे अन्न आपले शरीर ओळखत होते तेच आपण खात होतो व इतर अन्न आपण रोज खात नव्हतो.

ayurvedic treatment for cancer in pune
ayurvedic treatment for cancer in pune

दुसरा महत्वाचा मुद्दा, अन्नाच्या गुणवत्तेचा. हल्ली भाज्या, धान्ये, कड धान्ये पासून फळे, सुका मेवा, दुध, मांस.अंडी यापर्यंत कोणताही अन्नप्रकार घेतला तरी तो रासायनिक खते,रासायनिक जंतुनाशक फवारे यापासून मुक्त नाही.

शेतीचे उत्पन्न जास्तीत जास्त मिळावे यासाठी केले जाणारे सर्व उपाय आपल्याला कमीत कमी पोषण देत आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे दिसायला ताजे व रसरशीत दिसणारे पदार्थ प्रत्यक्षात शरीराला फक्त केमिकल्स चा पुरवठा करतात की काय असे वाटते.

वरील २ महत्वाच्या मुद्द्यावरून हे स्पष्ट होईल की ज्या आहारामधून आपले शरीर खरे तर घडायला हवे, त्याच्या अगदी विरुध्द प्रक्रिया ते अन्न खाऊन  होत आहे. यावर असलेला उपाय म्हणजे सेंद्रिय शेती मालाचा जास्तोत जास्त वापर करणे.

शिळे अन्न अजिबात न खाणे, दही कमीत कमी खाणे, दुध व फळे एकत्र असलेले पदार्थ न खाणे (जसे मिल्कशेक,थिक शेक, केळ्याचे शिकरण,फ्रुट सलाड) आपले प्रांतीय अन्नच जास्तीत जास्त वेळा खाणे.आठवड्यातून रोज, दाक्षिणात्य, पंजाबी, मेक्सिकन,थाई, चायनीज अशा विविध आहार पद्धतींचा शरीरावर भडीमार न करणे.

ayurvedic treatment for cancer
ayurvedic treatment for cancer

तिसरा मुद्दा, व्यायामाचा. आज काल व्यायामाचे २ प्रकार दिसत आहेत. बहुतेक वेळा १०-१२ तास एका जागी बसून काम व त्या मानाने व्यायाम काहीच नाही अशी परिस्थिती आहे. तर काही वेळा अति व्यायामाचे भूत डोक्यावर सवार होऊन अति प्रमाणात व्यायाम करणे.

यामध्ये ही अतिप्रमाणात जिम करणे हे प्रमाण जास्त आहे.मैदानी खेळ कमी झाले आहे. मोकळ्या हवेत फिरण्यास, पळण्यास, लोकांना वेळ नाही व अनेक शहरांमध्ये तशी शुद्ध हवा उपलब्ध नाही. याचा दुष्परिणाम दोन्ही बाजूने होतो आहे. अजिबात व्यायाम न करण्यामुळे वाढणारे वजन अनेक रोगांना तारुण्यातच आमंत्रण देते आहे.

शरीर लौकर दुर्बल होते आहे. दुसरीकडे, अति व्यायामाचे वेड हे पुन्हा शरीराला अनोळखी देशात घेऊन जाते. अति फुगणारी बॉडी, दिसायला बलदंड दिसते. ती तशी टिकावी म्हणून अजून वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या, पावडरी घेतल्या जातात.

ज्या दिवशी  हा पूरक आहार बंद आणि व्यायाम बंद त्या नंतर काही दिवसातच शरीर अतिशय दुर्बल होते व प्रमुख परिणाम स्नायूंवर होताना दिसतो. यासाठी आपण काय करत आहोत याचा सखोल विचार करणे.

आपण जो व्यायाम करणार आहोत त्यामुळे आपला लूक चांगला दिसेल यापेक्षा आपला फिटनेस कायम राहील याकडे लक्ष देणे जरुरी आहे. व्यायाम हे फॅड नसावे तर तो तुमच्या रोजच्या जगण्याचा एक सहज भाग असावा.

cancer causes

तिसरा महत्वाचा मुद्दा प्रज्ञापराध. म्हणजेच शरीर व मन या दोन्हीसाठी अयोग्य किंवा पुढे जाऊन निश्चित पणे वाईट परिणाम करणाऱ्या गोष्टी सातत्याने करणे. यामध्ये दारू, सिगारेट, ड्रग्ज, तंबाखू यासारखी व्यसने तर आलीच.

मात्र याशिवाय सतत असलेला कामाचा ताण, कामाच्या ठिकाणी असलेली सतत स्पर्धा,सहकाऱ्यांविषयी असलेली असूयेची भावना,अहंकार,नाते संबंधामध्ये वाढलेला ताण असे अनेक घटक आले. यामुळे जगण्यातील समाधान हरवले आहे.

मनःशांती हरवली आहे. आपण आपल्या कक्षे मध्ये न जगता सतत स्पर्धा करतच जगत आहोत. आणि त्यामुळे समाधान, शांती, प्रेमभाव, सदभावना, तृप्ती कमी झाले आहे. त्याची जागा अहंकार, द्वेष, स्पर्धा, नकारात्मक विचार यांनी घेतली आहे. त्यापोटी कधी अतिशय चढा-ओढीने जगणे तर कधी पूर्ण औदासिन्य येणे अशी दोन टोके वर्तनामध्ये दिसत आहेत.

आपले हे व्यक्तिगत छोटे आयुष्य जितके सुंदर, सकारात्मक आणि समाधानी असेल तितके रोग आपल्यापासून दूर राहतील. आणि अशा अनेक समाधानी व्यक्तींनी मिळूनच समाज बनत असतो.कॅन्सर तेव्हाच होतो जेव्हा शरीराला अनोळखी अशा अनेक घटना शरीर मध्ये सतत घडत राहतात. मग त्या आहारातील असोत किंवा विहारातील असोत किंवा आपल्या वर्तनातील असोत.

कॅन्सर आणि आयुर्वेद

वरील विवेचनावरून कॅन्सरचा विळखा का वाढतो आहे हे सहज लक्षात येईल. आणि त्यापासून मुक्तता मिळवायची असेल तर आपल्याला किती विस्तीर्ण प्रमाणात, वरील तीन स्तरांवर काम करायला हवे हेही लक्षात येईल. यामध्ये अवघड असे काहीच नाही. कारण साधे, सरळ, जगणे हे खरे तर सोपे असते. आपण ते गुंतागुंतीचे करतो. मग शरीरातही गुंतागुंत होऊ लागते.

कॅन्सर ची असलेली अनुवंशिकते सारखी कारणे तर आहेतच. काही इतरही कारणे आहेत. मात्र शरीराला अनोळखी असलेली आपली जीवन शैली कॅन्सर ला आपला विळखा घट्ट करायला मदत करत आहे हे निश्चित.वरील कारणांमधेच उपायही दडलेले आहेत.गरज आहे आपण जागे होण्याची आणि जीवन शैलीतील बदलाची.

कॅन्सर वर आयुर्वेदिक उपचार

कॅन्सर वर आयुर्वेदिक उपचार, आयुर्वेदा नुसार उपचार करताना या सर्व कारणांचा सखोल विचार केला जातो.

त्यामुळे खरी उपाय योजना केवळ औषधे देऊन थांबत नाही तर रुग्णास योग्य आहाराची सवय लावणे,  चुकीच्या सवयी बदलणे, त्याच्या मनातील नकारात्मक भाव काढून तिथे सकारात्मकता वाढवणे इथपर्यंत केली जाते. इतक्या सखोल चिकित्से नंतर कॅन्सर नक्कीच आटोक्यात येतो. पुन्हा पुन्हा होण्याचे प्रमाण नक्कीच कमी होते असा अनुभव आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे जीवनशैलीतील बदल काही झाल्यानंतर करण्यापेक्षा आधीच करणे.  In cancer, prevention is far important than cure.

तुम्हाला काही प्रश्न असल्यास आम्हाला संपर्क करा: Contact Us